अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय असतं.
दुस-या महायुध्दाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल तीन वर्षे व्यतीत करणा-या एका माणसाने निश्चित ध्येयाची आवश्यकता किंवा अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणाद्वारे सांगितली आहे.
व्हिक्टर फ्रॅन्कल त्या माणसाचं नाव होतं. सध्या ही व्यक्ती अमेरिकेच्या एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत आहे. ही व्यक्ती मनोरोगतज्ञ सुध्दा आहे.
नाझी छळछावण्यांमध्ये लोक रोज सकाळी मृत्यूला सामोरे जाण्याची संभावना घेऊनच झोपेतून उठायचे. नाना प्रकारचे छळ, विषारी वायू आणि उपासमार हे या लोकांचं रोजचं नशीब होतं.
कित्येक वेळा स्वतः मृत्यूच्या तोंडातून बचावलेल्या व्हिक्टर फ्रॅन्कल यांनी जवळून छळाचं निरीक्षण केलं – छळ करणा-यांचं आणि छळ सहन करणा-यांचं – दोघांचही.
ते म्हणतात, ‘छळछावण्यामधे सारख्याच परिस्थितीला तोंड देताना एक जण मरायचा आणि दुसरा वाचायचा’
व्हिक्टर फ्रॅन्कल यांना जे दिसलं ते अस की ज्या लोकांसमोर आयुष्यात काही निश्चित ध्येय होतं ते लोक वेगवेगळया छळांतून जिवंत बाहेर यायचे. पण ज्यांच्याजवळ जिवंत राहण्याचं काही कारण किंवा उद्देश नव्हता असे लोक सहज आणि पटापट मरुन जायचे. (अखेरीस या छळछावण्यांमधून शंभरात सरासरी चार पाच लोकांची जिवंत सुटका झाली.)
हे पुस्तक खरेदी साठी क्लीक करा
Title : ध्येय
Description : अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय असतं. दुस-या महायुध्दाच्या दरम्यान हिटलरच...
Rating : 5