स्पष्ट चिञ
ध्येय निश्चित झाल्यावर तुम्ही तुमच्या
मनाला ध्येयप्राप्तीच्या वेडाने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासाने अशा
प्रकारे व्यापून टाकायला पाहिजे की तुम्ही स्वतःला ध्येय प्राप्त झालेल्या
अवस्थेत पाहू शकता.
मायकलअॅन्जेलो नामक शिल्पकाराला जेव्हा
विचारलं गेलं की हा जो तू दगडाला कोरून इतका छान पुतळा बनवला ते तू कसं केलं.
शिल्पकार म्हणाला, काहीच नाही. पुतळा आधीच
तिथे होता – मी फक्त वरवरचा नको असलेला दगडाचा भाग काढून टाकला.
दगडात होता हेही खरंच आहे. पण पहिल्यांदा हा
पुतळा त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता
ध्येय निश्चित आणि स्पष्ट असल्याशिवाय
यशस्वी होण्या किंवा न होण्याचा मुद्रदा ही उपस्थित होत नाही.
तुम्ही तुमच्या ध्येयाबद़दल इतकं स्पष्ट
होण्याचा गरज आहे की त्याचं चिञ तुमच्या डोक्यात आणि डोळयांसमोर स्पष्टपणे उभं राहायला पाहिजे. प्रत्यक्षात
येण्यापुर्वी तुम्ही तुमच्या डोक्यात ते प्रत्यक्षात आल्याइतकं स्पष्ट
पाहू शकायला पाहिजे.
ज्याप्रमाणे
मायकलअॅन्जेलोने पुतळा कोरण्या आधी स्वतःच्या डोळयांसमोर त्या पुतळयाचं स्पष्ट
चिञ पाहिलं त्याप्रमाणे तुमच्या ध्येयाचं चिञ तुम्हाला स्पष्टपणे पाहता
यायला पाहिजे.
ध्येय निश्चित
करा.
तुमच्या ध्येयाला
मनात कोरुन टाका.
ध्येयाने झपाटून
जा.
यश तुमच्याकडे
अक्षरशः ओढलं जाईल.
ध्येयावर न
पोहोचणे ही शोकांतिका नाही.
पोहोचण्यासाठी ध्येयच
नसणे ही खरी
शोकांतिका आहे.
अशा माणसासाठी
काहीच अशक्य नाही ज्याला
माहित आहे त्याला
काय पाहिजे आणि ते
मिळवण्याचा ज्याने
निश्चय केला आहे.
कुठलीच प्रतिकूल
परिस्थिती इतकी शक्तिशाली
असू शकत नाही. की
निश्चित ध्येय असलेल्या
माणसाला ती कायमंच
अडवून ठेवू शकेल.
निश्चित ध्येय
आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा द्रुढ
निश्चय केलेल्या
माणसाला भेटल्यावर विरोध